पाच विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार - Marathi News 24taas.com

पाच विद्यार्थ्यांनी केला विद्यार्थीनीवर बलात्कार

www.24taas.com , पाटणा
 
ती आणि तो.  एकाच वर्गात शिकत होते. क्लासला जाताना दोघेही एकत्र जायचे. त्यांच्यात कालांतराने मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पण याच मैत्रीने तिचा घात केला. अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील पाच मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बिहार राज्यात घडली आहे.
 
पाचही  मित्र एव्हढ्यावर न थांबता बलात्कारानंतर पिडित विद्यार्थीनीचा एमएमएस तयार केला. तसेच सीडी बनवून हे विद्यार्थी पीडित युवतीचे वारंवार शोषण करीत असल्याचेही उघड झाले आहे, त्यामुळे पालक वर्गाला धक्काच बसला आहे. हा प्रकार बिहारमधील येथील राजवंशीनगर भागात हा प्रकार घडला आहे.
 
पीडित मुलीची वर्गातील प्रशांत याच्याशी ओळख झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एक दिवस प्रशांतने तिला राजवंशीनगर भागातील फ्लॅटवर बोलावले. या ठिकाणी प्रशांतचे चार मित्र आधीच आले होते. त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.  सुरवातीला बदनामीच्या भीतीने मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रारीसाठी पुढाकार घेतला नाही. मात्र, मुलांकडून ब्लॅकमेलिंग वाढल्यानंतर मुलीच्या एका नातेवाइकाने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा चंद्रमुखीदेवी यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर ही घृणास्पदबाब उघड झाली आहे.
 
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दखल घेतल्यानंतर पाचही संशयितांविरोधात सुलतानगंज पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पाचही संशयित फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
 
 

First Published: Thursday, July 26, 2012, 13:18


comments powered by Disqus