Last Updated: Thursday, July 26, 2012, 14:19
www.24taas.com, जालंधर देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी २०० रूपयांची गरज होती. मात्र, तिच्या आईवडिलांकडे तेवढीही पैसे नव्हते, त्यामुळे त्यामुलीवर उपचारच केले गेले नाहीत. परिणामी मुलीचे मृत्यू झाला. 'बेटी बचाव योजना' केवळ कागदावर का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जालंधर येथील शासकीय रूग्णालयात २० जुलै रोजी या मुलीचा जन्म झाला होता. तिचा जन्म वेळेपेक्षा आधी झाल्याने तिच्यावर एन्क्युबेटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्याचवेळी रुग्णालय प्रशासनाने मुलीच्या वडिलांना पैशांची व्यवस्था करण्यास सांगितले. एन्क्युबेटर विजेवर चालत असल्याने त्याची दोनशे रुपये रक्कम भरावी, असे त्यांना सांगण्यात आले. ती भरल्यासच उपचार पुढे सुरू ठेवण्यात येतील, अशी धमकीही संबंधित डॉक्टरांकडून देण्यात आली.
मुलगी खूप आजारी होती. मात्र, दोनशे रुपये आगाऊ रक्कम भरल्यानंतरच उपचार सुरू करण्यात येतील, असे रुग्णालयाच्सा वतीन सांगण्यात आले. मी हात जोडून विनवण्या केल्या. मात्र, मुलीवर उपचार केले नाहीत, असे कुमार यांनी सांगितले. तसेच मुलीच्या आईचेही सलाईनही बंद केले.
या मुलीच्या वडिलांचा व्यवसाय पेंटरचा. वडील संजीव कुमार यांनी दोनशे रूपयांसाठी सावकाराचे उंबरठाही झिजवला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पैसे देण्यासाठी कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. याउलट रुग्णालयानेही कोणत्याही प्रकारची सहानुभूती न दाखविल्याने मुलीचा मृत्यू ओढवला.
First Published: Thursday, July 26, 2012, 14:19