Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:54
www.24taas.com, नवी दिल्ली राहुल गांधींना लोकसभा नेतेपद द्या, अशी मागणी काँग्रेसच्या 10 खासदारांनी केली आहे. याबाबत त्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलंय. ही सध्याची गरज असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलंय.
काँग्रेस सरचिटणीस असलेल्या राहुल गांधी यांनी पक्षात मोठी जबाबदारी घ्यावी, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरतेय, यातच राहुल यांनीही पक्षात मोठी जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवलीय. मात्र याबाबतची वेळ पक्ष ठरवेल असंही राहुल यांनी स्पष्ट केलं होतं, तर सोनिया गांधींना याबद्दल विचारलं असता त्यांनी ‘राहुलची भूमिकेबद्दल राहुलच निर्णय घेईल इतर कुणीही नाही. त्यांनी कोणती जबाबदारी कधी स्विकारावी याबद्दल त्यांच्यावर कोणताही दबाव नाही’, असं म्हटलं होतं.
आता राहुल गांधींना मोठं पद वेळ आली असून, लोकसभा नेतेपद राहुल गांधींना द्यावं, अशी मागणी काँग्रेस खासदारांकडून करण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर, सध्या लोकसभा नेतेपद रिक्त आहे. या जागी ऊर्जामंत्री सुशीलकुरा शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
First Published: Thursday, July 26, 2012, 17:54