गुजरातमध्ये अवतरणार 'सीएनजी' युग - Marathi News 24taas.com

गुजरातमध्ये अवतरणार 'सीएनजी' युग

www.24taas.com, गुजरात
येत्या वर्षभरात गुजरातमधील सर्व वाहने सीएनजीवर धावणार आहेत. मुख्य म्हणजे दिल्ली आणि मुंबईतील सीएनजीच्या दराप्रमाणेच अहमदाबादलाही सीएनजीसह नॅचरल गॅसचा पुरवठा करण्यात यावा, असा आदेश गुजरात हायकोर्टानं केंद्र सरकारला दिलाय.
 
दिल्लीमध्ये सध्या ३८ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो असा सीएनजीचा दर आहे तर गुजरातमध्ये सीएनजीचा ५३ रुपये प्रतिकिलो असा दर आहे. हायकोर्टाच्या या आदेशामुळे गुजरातमध्येही आता सीएनजीचा दर ३८ रुपये ३५ पैशांवर येणार आहे. मुख्य न्यायाधीश भास्कर भट्टाचार्य आणि जे. बी. परडीवाला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलाय. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, असेही निर्देश केंद्र सरकारला देण्यात आलेत. गुजरातप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्रातही वाहने सीएनजीवर करण्याबाबतचा निर्णय कधी होणार, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्यात.
 
.

First Published: Friday, July 27, 2012, 10:53


comments powered by Disqus