पार्टी केली म्हणून... तरुणींचे फाडले कपडे - Marathi News 24taas.com

पार्टी केली म्हणून... तरुणींचे फाडले कपडे

www.24taas.com, मंगलोर
कर्नाटकातल्या मंगलोरमध्ये तालिबानी प्रकार पहायला मिळालाय. पार्टी करणाऱ्या मुला-मुलींना ५० जणांच्या मॉबनं बेदम मारहाण केलीय. मुलींचे कपडेही फाडण्यात आले.
 
एका रिसॉर्टमध्ये चार तरुण आणि चार तरुणी पार्टी करत असताना अचानक त्या ठिकाणी ५० तरुण आले आणि त्यांनी या मुला-मुलींना मारहाण करायला सुरूवात केली. हे सर्व घडत असताना त्या ठिकाणी काही काही पोलिसही हजर होते. मात्र, त्यांची संख्या कमी होती. त्यांनीही मारहाण करणाऱ्यांनाना रोखलं नाही.
 
मारहाण करणारे तरुण हिंदू रक्षक वेदिका या संघटनेचे कार्यकर्ते होते. रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती, असा दावा मारहाण करणाऱ्या तरुणांनी केलाय. मात्र, रेव्ह पार्टी असली तरी अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा आता पुढे येतोय. दरम्यान, हल्ला करणाऱ्या ५० जणांपैकी फक्त २० जणांनाच अटक करण्यात आली आहे.
 
.

First Published: Sunday, July 29, 2012, 12:36


comments powered by Disqus