एकाच वेळी नऊ राज्यांची वीज गेली... - Marathi News 24taas.com

एकाच वेळी नऊ राज्यांची वीज गेली...

www.24taas.com, नवी दिल्ली
 
दिल्लीसह उत्तर भारतातली वीज पहाटे दोन वाजल्यापासून गायब झाली आहे. आग्र्याजवळ नॉदर्न ग्रीड फेल झाल्यामुळं वीज गेली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदिगड, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यासह ९ राज्यातली वीज गेली आहे.
 
यामुळं दिल्लीतली मेट्रो रेल्वे सेवा ठप्प झालीय. तसंच जवळपास ३०० पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या रेल्वे खोळंबल्या आहेत. ग्रीड बंद पडल्याने उत्तर भारतात ९ राज्यात वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
 
अंधारात रात्री २ पासून सात राज्यातली वीज नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. तर दिल्लीतील मेट्रो रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. दिल्लीतील मेट्रो रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची अशी वाहतूक सेवा असल्याने ह्या सेवेवर परिणाम झाल्याने नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
 
 
 
 

First Published: Monday, July 30, 2012, 08:14


comments powered by Disqus