Last Updated: Tuesday, July 31, 2012, 10:37
www.24taas.com, नवी दिल्ली 
भ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले आहे. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्यास सांगितले आहे.
टीम अण्णांमधील त्यांचे सदस्य कुमार विश्वासने पत्रकारांसोबत मारहाण केली. झाल्या प्रकाराबाबत BEA ने निषेध व्यक्त केला आहे. अण्णाचं आदोंलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या मीडियाच्या लोकांसोबत टीम अण्णांच्या सदस्यांनी गैरवर्तवणूक केली होती. टीम अण्णांच्या सदस्यांनी मीडियावरही आरोप केले की, ते आमचं आंदोलन निष्पक्षरित्या कव्हर करीत नाहीत.
मात्र BEA ने त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. मीडिया आंदोलन अगदी तटस्थपणे कव्हर करीत आहे. त्यामुळे टीम अण्णांनी मीडियाची माफी मागावी असंही BEA ने म्हटंले आहे.
First Published: Tuesday, July 31, 2012, 10:37