अण्णांनी मागितली माफी, 'आंदोलन इथेच थांबवेन' - Marathi News 24taas.com

अण्णांनी मागितली माफी, 'आंदोलन इथेच थांबवेन'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
टीम अण्णांच्या वतीने अण्णा हजारे यांनी माफी मागितली आहे. अण्णा हजारे यांनी पत्रकारांची माफी मागितली, आणि दु:खही व्यक्त केलं. अण्णांच्या समर्थकांनी मीडियाशी हुल्लडबाजी केल्याने अण्णांनी स्वत: माफी मागितली आहे. अण्णा म्हणाले की, 'मीडियाशी असं वागणं चुकीचं आहे. त्यामुळे ह्या गैरवर्तणूकीबाबत मी आपली माफी मागतो'. त्याचबरोबर हे आंदोलन शांततामय झाले पाहिजे. यापुढे कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी, हिंसा झाल्यास हे आंदोलन मी मागे घेईलं असेही अण्णांनी स्पष्ट केले.
 
भ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले होते. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्यास सांगितली होती.
 
टीम अण्णांमधील त्यांचे सदस्य कुमार विश्वासने पत्रकारांसोबत मारहाण केली. झाल्या प्रकाराबाबत BEA ने निषेध व्यक्त केला. अण्णाचं आदोंलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या मीडियाच्या लोकांसोबत टीम अण्णांच्या सदस्यांनी गैरवर्तवणूक केली होती. टीम अण्णांच्या सदस्यांनी मीडियावरही आरोप केले  की, ते आमचं आंदोलन निष्पक्षरित्या कव्हर करीत नाहीत.
 
मात्र BEA ने त्यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. मीडिया आंदोलन अगदी तटस्थपणे कव्हर करीत आहे. त्यामुळे टीम अण्णांनी मीडियाची माफी मागावी असंही BEA ने म्हटंले आहे.
 
 
 

First Published: Tuesday, July 31, 2012, 16:08


comments powered by Disqus