६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प - Marathi News 24taas.com

६०कोटी जनता अंधारात, ५०० ट्रेन ठप्प

www.24taas.com, नवी दिल्ली

उत्तर भारतात पुन्हा अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे ६० कोटी जनता अंधारात आहे तर जवळपास ५०० रेल्वे गाड्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नॉर्दन ग्रीडचा फटका दिल्ली मेट्रोलाही बसला आहे. मेट्रोसेवा ठप्प झाली आहे.
 
इस्टर्न ग्रीडमध्येही तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे अनेक राज्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यचा फटका १४ राज्यांना बसला आहे.  उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि चंदीगडच्या अनेक भागांमधील वीज गायब झाली आहे. दिल्ली, जम्मू काश्मिर, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, चंदीगडसह हरियाणातील काही भागात वीज पुरवठा बंद झाला आहे.
 
याआधी रविवारी २.३०च्या सुमारास नॉर्दन ग्रीडमध्ये  तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नऊ राज्यांत ब्लॅक आऊट झाले होते. सोमवारी दुपारी ग्रीडमधे दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला होता. केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दाव्यानंतर २४ तासांच्या आत पुन्हा नॉर्दन ग्रीडमध्ये बिघाड झाला आहे.
 
नॉर्दन ग्रीडवरुन संपूर्ण उत्तर भारतात वीज पुरवठा केला जातो.  नॉर्दन ग्रीडच्या आग्रा येथून जाणा-या ४०० के.व्ही. हायटेंशन लाईनमध्ये पहिला बिघाड झाला होता.

First Published: Tuesday, July 31, 2012, 15:11


comments powered by Disqus