टीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबी - Marathi News 24taas.com

टीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबी

www.24taas.com, नवी दिल्ली
 
जनलोकपाल बिल मंजूर करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या टीम अण्णांना पोलिसांनी दमबाजी करण्यास सुरूवात केली आहे. तु्म्ही भाषण करताना वातावरण बिघडवू नका, असे सांगत तंबीची भाषा केली आहे.
 
दिल्लीतील जंतर-मंतरवर आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या टीम अण्णाला दिल्ली पोलिसांनी इशारा वजा धमकी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी सरकारला पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि गोपाल रॉय या अण्णांच्या सहकार्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.  त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
 
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती अधिकच खालावली आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आमचे आंदोलन हे चांगले करण्यासाठी बलिदान आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेसची विनंती
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी टीम अण्णा यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. टीम अण्णांनी लवकरात लवकर उपोषण सोडावे.  टीम अण्णाने सरकारला थोडा वेळ देण्याची गरज आहे. तसेच जनतेने निवडून दिलेल्या खासदारांवरही त्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. असे सांगतानाच टीम अण्णांचे म्हणणे सरकारने ऐकून घेतले पाहिजे. सरकारने टीम अण्णाशी बोलणी केली पाहिजे. मात्र टीम अण्णाने सरकारच्या डोक्याला बंदूक लावून हे काम करवून घेऊ नये, असा सल्लाही दिला आहे.
 
.

First Published: Wednesday, August 1, 2012, 19:06


comments powered by Disqus