अण्णांची घोषणा, सोडणार उपोषण - Marathi News 24taas.com

अण्णांची घोषणा, सोडणार उपोषण

www.24taas.com, नवी दिल्ली
 
जंतर-मंतरवर  गेल्या नऊ दिवसापासून सुरु असलेले टीम अण्णाचे आंदोलन अखेर शुक्रवारी सायंकाळी सुटणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द अण्णा हजारे यांनी आज दुपारी जंतरमंतरवर केली. यावेळी ते म्हणाले, आंदोलन करुन प्रश्न सुटणार नसल्याचे अनेक तज्ञांनी व नागरिकांनी आम्हाला सांगितले आहे.
 
टीम अण्णा उद्या (शुक्रवार) सायंकाळी उपोषण सोडणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली. टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी  होऊ लागली होती. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केलं होतं.
 
अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे. देशाला सशक्त राजकीय पर्याय हवाय, तो टीम अण्णांनी द्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. देशाच्या जनतेकडून यासंदर्भात आपली मतं मागवावीत असं आवाहनही करण्यात आलं आहे.
 
 
 

First Published: Friday, August 3, 2012, 15:17


comments powered by Disqus