इशरत जहा प्रकरणात २० पोलिसांवर आरोपपत्र - Marathi News 24taas.com

इशरत जहा प्रकरणात २० पोलिसांवर आरोपपत्र


झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
 
२००४ गुजरात मध्ये झालेल्या एन्कांउटर मध्ये इशरत जहा हिचा हकनाक बळी गेला होता या आरोपामुळे आता २० पोलिसांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकारीने सांगितले की जवळजवळ २० पोलीसांना हत्येच्या आरोपाखाली त्यांचा वर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुजरात हायकोर्टने १ डिसेंबरला पुढील चौकशीचे सीबीआयला आदेश दिले होते.
 
१९ वर्षीय इशरत, जावेद शेख उर्फ प्राणेश पिल्ले, अमजद अली राणा और जीशान जौहर ला अहमदाबाद येथे एन्कांऊटरमध्ये मारण्यात आलं होतं. पण विशेष चौकशीनंतर गेल्या महिन्यात हायकोर्ट या निकषापर्यंत पोहचले की हे एन्कांउटर एक नाटक होतं त्यामुळे त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. इशरत झा एनकाऊंटर प्रकरणात सीबीआयनं २० पोलिसांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी याची चौकशी करत असून त्यांनी १५ डिसेंबरला याबाबत तक्रार केली होती.
 
त्यानंतर नव्यानं एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सर्व पोलिसांवर खुनाचा गुन्हा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गुजरात हायकोर्टानं १ डिसेंबरला सीबीआयला याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. इशरत जहॉ, जावेद शेख, अमजद अली राणा आणि झीशन जोहर यांच इनकाऊंटर झालं होतं. पोलिसांनी हे एनकाऊंटर केल्याचं विशेष तपास पथकानं सांगितलं होतं.

First Published: Sunday, December 18, 2011, 11:47


comments powered by Disqus