Last Updated: Wednesday, August 8, 2012, 20:30
www.24taas.com, चेन्नई 
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. सोमवारी त्यांना चेन्नईतील ग्लोबल रुणालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार करणार्या डॉक्टरांच्या मते विलासरावांच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) निकामी झाले आहे.
त्यांच्या लिव्हरमध्ये कॅन्सर (हॅपेटोसेल्युलर कार्सिनोमा) आहे. तथापि, कुटुंबीयांनी मज्जाव केल्याने रुग्णालयाने हेल्थ बुलेटिन जारी केलेले नाही. ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार विलासरावांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
प्रकृतीत सुधारणा होत नाही तोवर त्यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विलासरावांच्या खात्याचा अतिरिक्त प्रभार केंद्रीय लघुउद्योग मंत्री वायलर रवी यांच्याकडे सोपवला आहे.
First Published: Wednesday, August 8, 2012, 20:30