मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी - Marathi News 24taas.com

मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी

www.24taas.com, नवी दिल्ली
‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. 'यूपीए -2 सरकार अवैध आहे' या  अडवाणींच्या वक्तव्यामुळे मात्र सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.
 
संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या राजधानीत सुरू आहे.  पहिल्या दिवशीच आसाम हिंसाचारावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावेळी आसामची स्थिती स्फोटक असल्याचं स्पष्ट करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं.  आसाम हिंसाचार हे केंद्राचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलंय. एव्हढंच नव्हे तर यूपीए सरकारच अवैध असल्याचाही आरोप अडवाणींनी यावेळी केला. यानंतर आसामच्या हिंसाचारवर गृहमंत्र्यांचं निवेदन सुरु असताना विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.  यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत अधिवेशन पुन्हा स्थगित करण्यात आलंय. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधीही प्रचंड संतापलेल्या दिसल्या.
 
 
आसामच्या हिंसेत एके-४७चा वापर
आसाममध्ये भडकलेला हिंसाचार अजून शांत झालेला नाही तरच यासंदर्भातच आलेल्या आणखी एका बातमीनं एकच खळबळ उडवून दिलीय. जातीय हिंसा सुरू असताना दंगेखोरांना लोकांना मारण्यासाठी एके-४७ सारखी घातक शस्त्र वापरल्याची माहिती आता पुढे येतेय. या खुलाशामुळे सरकारच्या चिंतेत आणखीनच भर पडलीयय. राज्य सरकारनं बोडो क्षेत्रात हत्यारं जप्त करण्याचे आदेश दिलेत. तसंच या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केंद्राकडे केलीय. आसाममध्ये उसळलेल्या या हिंसेत आत्तापर्यंत ७३ जण बळी पडलीत.
 
.

First Published: Thursday, August 9, 2012, 01:26


comments powered by Disqus