Last Updated: Monday, December 19, 2011, 05:49
झी २४ तास वेब टीम, गोवा 
गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त गोवा सरकारच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षापूर्वी पोर्तूगीजांची राजवट उलथवून लावण्यात नौदल, वायूदल आणि सेनादलातील सैनिकांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.
अनेक वर्ष पोर्तुगिजांची सत्ता असणाऱ्या पोर्तुगिजांची सत्ता ही भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही गोव्यावर होती. पण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काही वर्षाने गोवा पोर्तुगिजांच्या बंधनातून मुक्त केला आणि त्याचे भारतात विलिनीकरण केले.
सुवर्णमहोत्सवाच्या यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षणमंत्री ए.के.एन्टोनी आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत उपस्थित होते. भारतीय सैन्यांनी ऑपरेशन विजयमध्ये मोलाची कामगिरी बजावली होती आणि त्यांचा सन्मान करणं आपलं भाग्य असल्याचं सोनिया गांधींनी म्हटलं.
First Published: Monday, December 19, 2011, 05:49