सासू-बायकोची साथ, जावई करायचा बलात्कार - Marathi News 24taas.com

सासू-बायकोची साथ, जावई करायचा बलात्कार

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मुलींवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. पण आता त्याला काही महिलाच कारणीभूत आहे. सासू आणि बायकोच्या साथीने एक नराधम महिलांवर बलात्कार करायचा. नवी दिल्लीतील पंचकूला या भागातील ही घटन आहे. हा नराधम बलात्कार करायाचा आणि त्या दोघी ह्याची अश्लील व्हिडिओ बनवित असे. जावई मुलींना आपल्या वासनेची शिकार करत होता.  आणि त्या दोघी त्यांना साथही देत होत्या.
 
एका मुलीला मुलगा झाला तेव्हा त्या बालकाला २१ हजार रुपयात विकण्यात आले. आहे.  त्यानंतर जेव्हा केव्हा मुलींना गर्भ राहिला तेव्हा त्यांना औषध देऊन त्यांचा गर्भपात केला जात होता.
 
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, अपना घरमध्ये मुलींसोबत दुष्कृत्य होतच होते. त्याचबरोबर दिल्लीच्या रेड लाईट एरियातही त्यांची विक्री केली जात होती. अशा प्रकारे देहव्यापाराच्या दलदलीत मुलींना ढकलण्याचे काम संचालिका जसवंती देवी करत होती.  ज्या मुली जसवंती देवीला विरोध करत असत त्यांना चटके दिले जात होते. त्यांचा शारिरिक छळ केला जात होता.
 
 
 
 

First Published: Thursday, August 9, 2012, 05:52


comments powered by Disqus