लोकपालसाठी संसदेचा कार्यकाळ वाढणार का? - Marathi News 24taas.com

लोकपालसाठी संसदेचा कार्यकाळ वाढणार का?


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
संसदेत लोकपाल बिल उद्याच मांडण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चर्तुर्वेदी यांनी सांगितले. आणि त्याचसोबत हिवाळी अधिवेशनाचा कालवधी देखील वाढणार असल्याचे समजते. २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर इतका कार्यकाळ वाढविण्यात आला आहे. जर का ह्या कार्यकाळात लोकपाल मान्य झाले तर अण्णा हजारे उपोषण करणार नसल्याचे समजते.
 
संसदेत उद्या लोकपाल विधेयक मांडलं जाणार आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सत्यव्रत चर्तुर्वेदी यांनी ही माहिती दिली. दरम्यान लोकपाल तसंच इतर महत्त्वाची विधेयके पाहता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. नियोजित कार्यक्रमानुसार संसदेचं अधिवेशन या आठवड्यात संपणार आहे. त्यामुळं सरकारनं हा अवधी वाढवण्याबाबत विरोधकांशी चर्चा सुरु केली आहे.
 
अर्थमंत्री आणि सरकारचे संकटमोचक असलेले प्रणव मुखर्जी यांनी भाजप नेत्यांशी चर्चा सुरु केली आहे. या बैठकीत लोकपालवरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. मुखर्जी यांच्या बरोबरच्या बैठकीला लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, यशवंत सिन्हा उपस्थित आहेत. लोकपाल याच अधिवेशनात मंजूर करण्याबाबत सरकारवर दबाव आहे. त्याच बरोबर अन्न सुरक्षा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. त्यामुळंच अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचा प्रयत्न आहे. संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीतही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

First Published: Monday, December 19, 2011, 08:42


comments powered by Disqus