लोकपाल आज पास होणार का ? - Marathi News 24taas.com

लोकपाल आज पास होणार का ?

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
लोकपालच्या मसुद्याला अंतिम स्वरुप देण्याचं काम सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळं नव्यानं बनवण्यात आलेला हा मसुदा आज मंत्रीमंडळासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळानं यावर शिक्कामोर्तब केल्यास आज किंवा गुरुवारी संसदेत सुधारीत लोकपाल विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
 
पंतप्रधान, सीबीआयचा तपास आणि खटला चालवण्याचा अधिकार असलेला विभाग लोकपालच्या कक्षेत आणण्याची तयारी सरकारी पक्षाकडून सुरु असल्याचं सांगण्यात येतं आहे.  हिवाळी अधिवेशनाला २७ - ३० डिसेंबर अशी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून या दिवसांत  लोकपाल  विधेयकावर संसदेत चर्चा होण्याची शक्यता असल्याचे संसदीय कामकाज मंत्री बन्सल यांनी सांगितले .
 
२२ डिसेंबरपासून असलेली नाताळची सुट्टी संपवून २७ तारखेला संसदेचे कामकाज पुन्हा सुरू होईल , अशी माहिती बन्सल यांनी दिली . आज पंतप्रधान विधेयकाचा मसुदा पाहतील आणि त्यानंतर दुपारी दोन वाजचा विधेयत मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल.
-

First Published: Tuesday, December 20, 2011, 05:25


comments powered by Disqus