Last Updated: Tuesday, December 20, 2011, 06:42
झी २४ तास वेब टीम, दिल्ली 
थंडीने आता हळूहळू आपला रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. उत्तरोत्तर थंडीचा कडाका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे थंडीमुळे सगळे जास्तच गारठले आहेत. थंडीचा वाढत्या तडक्यामुळे जवळजवळ ३९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे देशभरात कडाक्याची थंडी पसरली आहे. उत्तर भारतात थंडीचा विशेष प्रभाव जाणवतो आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दिल्लीत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. दाट धुक्यामुळे दिल्लीतल्या जनजीवनावर परिणाम झाला आहे.
रस्त्यांवर गाडी चालवणं कठिण होऊन बसलं आहे. रेल्वे तसचं विमान वाहतूकीवरही दाट धुक्याचा परिणाम जाणवतो आहे. उत्तर भारतात गेल्या तीन दिवसांत तब्बल १०५ हून अधिक ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
First Published: Tuesday, December 20, 2011, 06:42