Last Updated: Tuesday, December 20, 2011, 06:40
झी न्यूज आणि महिंद्रा कंपनीचा उपक्रम
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली राजधानी दिल्लीत एक अनोखा सोहळा रंगला. झी न्यूज आणि महिंद्रा कंपनीने आयोजित केलेल्या एका शानदार सत्कार सोहळ्यात देशात पहिल्यांदाच ट्रांन्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या ३० पेक्षा जास्त लोकांचा सन्मान कऱण्यात आला.
यामध्ये ट्रक ड्रायव्हर, ढाबा मालक, फाईनान्स क्षेत्राव्यतिरीक्त ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये काम करणा-या इतरही गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, महेंद्र नेवीस्टारचे चेअरमन आनंद महेंद्रा आणि झी न्युज लिमीटेडचे सीईओ वरुण दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
First Published: Tuesday, December 20, 2011, 06:40