सेना प्रमुखांचे रौद्र 'वीणा' वादन - Marathi News 24taas.com

सेना प्रमुखांचे रौद्र 'वीणा' वादन

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वीणा मलिक तसेच सर्व पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तानात परत पाठवून देण्याची  मागणी केली आहे. शिवसेना प्रमुखांनी पक्षाचे मुखपत्र सामना मधून वीणा मलिकचे वाभाडे काढले आहेत. देशाच्या संस्कृतीवर वीणा  मलिक कलंक असल्याचं सेना प्रमुखांनी म्हटलं आहे. ही वीणा मलिक कोण आहे ? तिच्या बाबतीत एवढी चर्चा का असा खडा  सवालही सेना प्रमुखांनी केला आहे. ही बाई प्रसिद्धीसाठी गायब होते आणि काही वेळा ती बिग बॉसमध्ये अश्लिल चाळे करते तर  मासिकांना स्वत;ची नग्न छायाचित्रं काढून देते. वीणा ही काही पाकिस्तानातील मोठी अभिनेत्री नाही की तिची आपण प्रशंसा करावी  असंही ते म्हणाले.
 
बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या इतर पाकिस्तानी कलाकारांवर बाबतही त्यांनी संताप व्यक्त केला आहे. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम देण्याचा ट्रेंडच आहे. आणि एकदा हे देशात आले की परत जाण्याचं नाव घेत नाही. पाकिस्तानी भारतात क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येतात आणि गायब होतात. आता ते दहशतवादी संघटनांसाठी काम करतात का नाही हे सांगणंही कठिण जातं. दुसरीकडे भारतीय कलाकारांना पाकिस्तान सरकार वीसा देखील देत नाही. अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि आशा भोसले सारख्या कलाकारांवर तर पाकिस्तानने जणु बंदीच घातली आहे. वीणा मलिकचे पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयशी संबंध असल्याचं डॉली बिंद्राचे म्हणणं आहे तसं असल्यास ज्याने वीणाला विसा दिला त्याला तुरुंगात धाडायला हवं. अग्रलेखाची अखेर करताना शिवसेनाप्रमुखांनी लिहिलं आहे की वीणाला नरकात पाठवून देशातली ही घाण आपण साफ करायला हवी.
 
 

First Published: Tuesday, December 20, 2011, 11:52


comments powered by Disqus