Last Updated: Thursday, December 22, 2011, 04:35
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
गेले अनेक दिवस चर्चेचा ठरलेला लोकपाल बिल आज संसदेत चर्चेला येणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात या लोकपाल बिलाविषयी कमालीची उत्सुकता आहे. मागील काही दिवसांपासून सरकार आणि टीम अण्णा यांच्यामध्ये लोकपालच्या मसुद्यावरून मतभेद सुरू आहेत. आता यापुढे हे लोकपाल बिल पास होणार का? याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
आज संसदेत लोकपाल बिल मांडण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बिलाबाबत चर्चा सुरू आहे. सरकारने लोकपालचा अंतिम मसुदा तयार केला आहे आणि आता आज संसदेत हे बिल अंतिम मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
मात्र, दुसरीकडे अण्णा हजारे यांनी सरकारच्या या मसुद्यावर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे या बिलावर आज संसदेत चांगलीच गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, December 22, 2011, 04:35