युद्ध आमुचे सुरू..... - Marathi News 24taas.com

युद्ध आमुचे सुरू.....

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी 
 
‘हिंमत असेल तर सोनिया गांधींनी मीडिया आणि जनतेसमोर लोकपालावर चर्चा करावी’ असं आव्हानच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिलं आहे. तर दुसरीकडे अण्णांना चोख उत्तर देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यादेखील पुढे सरसावल्या आहेत.
 
' यूपीए ' च्या नव्या लोकपाल विधेयकावर अण्णा हजारे यांनी टीका करत पुन्हा लढाईचे हत्यार उगारले आहे तर, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही आक्रमक झाल्या आहेत, मी माघार घेणार नाही असा संदेश पक्षाच्या खासदारांना देऊन अण्णांना थेट आव्हान दिले आहे.  काँग्रेसविरोधात जाणीवपूर्वक चालवलेल्या अपप्रचाराची पर्वा न करता लोकपाल विधेयकासाठी मी संघर्ष करेन
 
तर अण्णांनी, सोनिया गांधीनी मीडियासमोर चर्चा करावी, त्यानंतर संपूर्ण देशाला समजेल की सरकारचं विधेयक सक्षम आहे की कुचकामी. असा खडा सवालच केला. अण्णा हजारे २७, २८, २९ डिसेंबर रोजी मुंबईत उपोषण करणार असून १, २ आणि ३ जानेवारीला दिल्लीत जेलभरो करणार असल्याचं  सांगितलं. हे जेलभरो  सोनिया आणि राहुल गांधींच्या घरसमोर करणार आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून देशातील जनता लोकपाल विधेयकासाठी आंदोलन करत आहेत. सीबीआय लोकपालाच्या कक्षेत असवी असं जनता सांगत आहे, मात्र सरकार बहिरं झालं आहे, असं अण्णा म्हणाले

First Published: Thursday, December 22, 2011, 09:31


comments powered by Disqus