दिल्ली गारठली - Marathi News 24taas.com

दिल्ली गारठली

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
देशाची राजधानी दिल्ली आज गारठली आहे. दिल्ली शहराचे तापमान ३.३ डिग्री सेल्सिअस अंशावर गेले आहे. त्यामुळे रस्तावर सकाळी शुकशुकाट दिसून येत आहे.
 
वातावरणातील झालेल्या बदलामुळे दिल्लीचे तपमानात कमालीची घट झाली आहे. ३.३ डिग्री सेल्सिअस अंशावर तपमान गेल्याने कटाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान खात्याने याआधी थंडी पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार वातारणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. शहरात आणखी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना कड्याक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.
 
हवामान खात्याने याआधी ३ डिग्री सेल्सिअस अंशावर तपमान खाली जाईल, असे स्पष्ट केले होते. शुक्रवारी दिल्लीचे कमाल तापमान २१.७  तर किमान ६ सेल्सिअस अंश होते. मात्र, आज तापमानात घट झाल्याने नागरिक गारठून गेले आहेत. २५ डिसेंबर ते १५ जानेवारी २०१२ पर्यंत थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

First Published: Saturday, December 24, 2011, 10:55


comments powered by Disqus