गोवा ट्रीप महाग भारी, त्यापेक्षा लंडनवारी बरी - Marathi News 24taas.com

गोवा ट्रीप महाग भारी, त्यापेक्षा लंडनवारी बरी

झी २४ तास वेब टीम, गोवा
 
न्यू ईयर साजरा करण्यासाठी असणारा हॉटस्पॉट म्हणजे 'गोवा'. निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण याने साहजिकच अनेक पर्यटकांचे पाय आपसूकच वळतात, आणि त्यात न्यू ईयर म्हंटल तर पाहायालाच नको... पण आता गोव्याला जायचा विचार करत असल्यास तुम्हाला हजारो रूपये मोजावे लागणार आहे.
 
न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गोव्याला विमानानं जाण्याचे प्लॅन्स असतील तर तुमच्या खिशाला मोठी चाट बसणार आहे. मुंबई- गोवा विमानाच्या भाड्यात एक दोन नव्हे तर तब्बल दहा पटींनी वाढ झाली आहे. मुंबई - गोवा विमानाचं भाडं तब्बल ७० हजारांच्या घरात गेलं आहे.
 
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या २८ डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान जाणाऱ्या सगळ्या विमानांचे रिटर्न तिकीट ६९ हजार १९२ रुपये एवढं लावण्यात आलं आहे. दुसऱ्या खासगी विमान कंपन्यांचे भाडंही ५० ते ६८ हजारांच्या घरात  गेला आहे. मुंबई गोव्यासाठी सत्तर हजार रुपये मोजावे लागत असतानाच मुंबई - लंडन प्रवासाचं विमान भाडं ४५ हजार ८७० रुपये इतंकच आहे.
 

First Published: Sunday, December 25, 2011, 14:57


comments powered by Disqus