काय अण्णा चाले 'संघाच्या संगे' ??? - Marathi News 24taas.com

काय अण्णा चाले 'संघाच्या संगे' ???

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
लोकपाल आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असल्याचा दावा एका हिंदी वृत्तपत्रानं केला आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक दिवंगत नानाजी देशमुख यांच्याशी अण्णा हजारे यांची जवळीक असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे.
 
स्वयंसेवी संस्थांच्या एका संघटनेत नानाजी देशमुख अध्यक्ष होते, तर अण्णा हजारे या संघटनेच्या सरचिटणीसपदी असल्याचंही या वृत्तात नमूद करण्यात आल आहे. १९८३ साली दिनदयाल शोध संस्थानमध्ये या संघटनेची एक बैठक पार पडली होती. यात देशभरातील सुमारे १८ सदस्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात अण्णा हजारेंचा सक्रीय सहभाग होता. यावेळी अण्णांनी या ठिकाणी तीन दिवस मुक्कामही केला होता.
 
अण्णांच्या उपोषणाच्या तोंडावर काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी या बातमीचा हवाला देत, काडी टाकण्याचा प्रयत्न केला टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा आणि नानाजी देशमुख एकत्र ग्रामीण विकासाचं काम केलं होतं. त्यामुळे संघाशी संबंध नसल्याचं म्हणणारे अण्णा या दाव्याने नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.
 

 

First Published: Sunday, December 25, 2011, 19:09


comments powered by Disqus