दिल्लीत दसऱ्याला ‘राज’ दहन! - Marathi News 24taas.com

दिल्लीत दसऱ्याला ‘राज’ दहन!

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
मुंबईतील गरीब ऑटोरिक्षा चालक आणि उत्तर भारतीयांविरुद्ध राज ठाकरे यांच्या मनसेने व शिवसेनेने आक्रमक हल्ले चढवल्याच्या निषेधार्थ दिल्लीच्या जंतर मंतरवर युवा भारत फाउंडेशन या बिहारी संघटनेने जोरदार निदर्शने केली व राज ठाकरेंच्या पुतळयाचे दहनही केले.मुंबईत उत्तर भारतीय नागरिकांना व गरीब ऑटोरिक्षा चालकांना लक्ष्य बनवून त्यांच्यावर जाणीवपूर्वक हल्ले चढवले जात आहेत.
 
मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला अथवा नैसगिर्क आपत्ती आली तर ठाकरे कुटुंबाचा आवाज ऐकू येत नाही. विदर्भात मराठी शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र त्यांच्या जीवितांचे रक्षण करण्यासाठी मनसे अथवा शिवसेना काही करीत नाही, असाही आरोप संघटनेने केला.कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखालील ऑटो रिक्षा संघटनेने हरताळ केल्यावर बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय रिक्षा चालकांना मारहाण केली आणि सरकारनेही बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

First Published: Sunday, October 9, 2011, 13:20


comments powered by Disqus