Last Updated: Wednesday, December 28, 2011, 14:37
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली सरकारी लोकपाल विधेयक मंगळवारी रात्रा लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर आज जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेत भाजपाचा खरा चेहरा समोर आल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारी लोकपाल विधेयक मंजूर करताना विरोधकांच्या सर्व पुरवणी मागण्या फेटाळण्यात आल्या. त्यामुळे पत्रकारांनी सोनिया गांधी यांना राज्यसभेत विधेयक मंजूर होणार का, असे विचारले. परंतु सोनिया गांधी यांनी राज्यसभेत विधेयकाबाबत मौन पाळले.
केंद्र सरकारला सक्षम विधेयक आणायचे आहे. मात्र, भाजपने शेवटच्या क्षणी आपली भूमिका बदलली. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यांना सक्षम विधेयक नकोच होते, त्यामुळे मतदान करावे लागले, अशी कबुली सोनिया गांधी यांनी यावेळी दिली.
First Published: Wednesday, December 28, 2011, 14:37