रशियन पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होणार - Marathi News 24taas.com

रशियन पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होणार

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
भारतीय नौदलात बहू प्रतिक्षीत रशियन बनावटीची नेरपा ही अणवस्त्र सज्ज पाणबुडी येत्या काही  दिवसात दाखल होणार आहे. ही पाणबुडी दहा वर्षांच्या लीजवर घेण्यात आली असून तिची किंमत  आहे तब्बल ९२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी आहे.
 
नेरपा अणवस्त्र पाणबुडीच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या काही दिवसात भारतीय नौदलाला  लीजवर देण्यास तयार असल्याचं रशियन अभियंताने सांगितलं. सर्व प्रकारच्या कामगिरीसाठी ही  पाणबुडी सज्ज असल्याचं अमूर शिपयार्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं आहे. अमूर  शिपयार्डमध्ये या पाणबुडीची बांधणी करण्यात आली आहे. पाण्याखाली अनेक महिने राहण्याची या  पाणबुडीची क्षमता असून लवकरच तिचं नामकरण आयएनएस चक्र असं करण्यात येणार आहे. भारतीय नौदलात गेल्या दोन दशकात पहिल्यांदाज अणवस्त्र सज्ज पाणबुडी दाखल होत आहे.
 
जगात सध्या फक्त पाच देशांकडेच अणवस्त्र सज्ज क्षमतेच्या पाणबुड्या आहेत त्यांच्या यादीत भारताचा समावेश होईल. मागच्या महिन्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रशियाच्या भेटीच्या वेळेस या पाणबुडीच्या व्यवहारा संदर्भात चर्चा झाली होती. नेरपा ही पाणबूडी २००८ साली भारताच्या सुपूर्द करण्यात येणार होती पण चाचणीच्या दरम्यान एका अपघातामुळे त्याला विलंब झाला. अकूला २ क्लासच्या पाणबुडीत २८ अणवस्त्र सज्ज क्षेपणास्त्र असतात आणि त्या ३००० किमी पर्यंत मारा करु शकतात. भारताला सुपूर्द करण्यात येणाऱ्या नेरपा पाणबुडीत ३०० किमी क्लब अणवस्त्र सज्ज क्षेपणास्त्र बसवण्यात आली आहेत.  भारताने सोविएत संघाच्या १९९१ साली झालेल्या विघटनानंतर या पाणबुडीच्या बांधणीसाठी अर्थसहाय्य दिलं होतं.
 
 

First Published: Wednesday, December 28, 2011, 16:47


comments powered by Disqus