Last Updated: Thursday, December 29, 2011, 17:56
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली यंदाच्या वर्षात एक करोड भाविकांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतलं. भारतात तीर्थक्षेत्राला एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याचा हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत साडे बारा लाख यात्रेकरु अधिक आल्याचं धर्मस्थळ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बुधवार संध्याकाळी माता वैष्णोदेवीच्या यात्रेला आकड्याने एक करोडचा आकडा पार करत एक नवा इतिहास घडवला. जयपूरहून आलेल्या डॉक्टर राकेश विश्वकर्मा यांना एक करोडावे भक्त बनण्याचा सन्माना प्राप्त झाला. २०१० साली माता वैष्णोदेवीच्या दर्शनाला ८७ लाख ४९ हजार यात्रेकरु आले आहेत. श्रीमाता वैष्णोदेवी धर्मस्थळ बोर्डाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंदीप के भंडारी म्हणाले की या नव्या विक्रमामुळे आम्ही खुश आहेत. यंदाच्या वर्षात एक करोड भाविकांनी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेतलं हा ऐतिहासिक मैलाचा टप्पा आम्ही पार केला आहे.
First Published: Thursday, December 29, 2011, 17:56