सिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला - Marathi News 24taas.com

सिंघवींचा भाजपावर कडाडून हल्ला

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
लोकपाल विधेयकावर राज्यसभेत चर्चेच्या दरम्यान काँग्रेसचे वरिष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भारतीय जनता पार्टी विधेयक मंजुर न  करण्यासाठी  बहाणे बनवत असल्याचं आरोप केला. देशहित लक्षात घेऊन विधेयक मंजुर करा असं आवाहन सिंघवी यांनी केलं. भाजपा या मुद्दावर  स्पष्ट भूमिका घेत  नसल्याचा आरोपही केला.
 
लोकपाल चर्चेची सुरवात करताना सिंघवी यांनी विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्यावर कडाडून  हल्ला केला. सिंघवींनी  तुम्ही लोकपाल विधेयक मंजुर करुन इच्छित आहात की नाही असा सवाल केला. लोकपाल आणि लोकायुक्त बाबतीत  भाजपाची भूमिका दुट्टपीपणाची  असल्याचंही सिंघवी म्हणाले.
 
भाजपाला लोकपालमध्ये स्वारस्य नसून त्यांना फक्त गोंधळ घालायचा आहे.  लोकशाही संस्था बरबाद करण्याचा प्रयत्न  करता कामा नये. भाजपाला विधेयकही मंजुरही करायचं नाही आणि त्याला घटनात्मक दर्जाही मिळु  द्यायचा नाही आहे.
 
 
भाजपाने स्टँडिंग कमिटीमध्ये घटनात्मक दर्जाच्या विषयावर प्रश्न का उपस्थित केले नाहीत असा खडा सवालच सिंघवींनी केला. भाजपाला विधेयक मंजुर करायचं नसल्यास त्यांनी बहाणे सोडण्याची हिम्मत दाखवावी असं आवाहनही सिंघवी यांनी केलं. भाजपाने देशपासून लपवाछपवी करु नये.
 
 
भाजपाचे सदस्य एका सभागृहात स्थायी समितीकडे विधेयक पाठवा असं सांगत आहेत. भाजपाने प्रामाणिकपणा दाखवावा आणि एक स्पष्ट भूमिका विधेयकाबाबत घ्यावी असं सिंघवींनी सुनावलं. आपल्याला  लोकपाल विधेयक मंजुर करायचं नसेल तर तसं स्पष्टपणे सांगा आणि स्टँडिंग कमिटीकडे परत पाठवायचं का असा सवालही सिंघवींनी केला.
 
 
 
 
 
 

First Published: Thursday, December 29, 2011, 17:55


comments powered by Disqus