ममता सरकारवर प्रसन्न होणार का ? - Marathi News 24taas.com

ममता सरकारवर प्रसन्न होणार का ?

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
राज्यसभेत लोकपाल विधेयकावर महाचर्चा सुरु आहे. पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जींची ममता बॅनर्जींशी चर्चा सुरु  आहे. तृणमुल काँग्रेसला मनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकपालसाठी संख्याबळ जुळवण्याची कसरत सुरु  आहे. सरकारकडे राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नाही.  त्यामुळे विधेयकाचं भवितव्य अंधातरी लटकलं आहे. काँग्रेस  कोअर कमिटीची बैठकही सुरु आहे.
 
बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीने लोकपाल विधेयकाच्या विरोधात मतदान देण्याचे संकेत दिले आहेत.काँग्रेसकडून दोन्ही पक्षांची समजुत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस बसपा आणि सपाच्या संपर्कात आहे.  तरीही लोकपाल विधेयक मंजुर होण्याची शक्यता धूसर आहे. शिवसेनाही लोकपालच्या विरोधात मतदान करणार आहे. आज चर्चेत विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी सरकारवर हल्ला बोल चढवला.
 

First Published: Saturday, December 31, 2011, 09:33


comments powered by Disqus