थेन चक्रीवादळाने घेतले अठरा बळी - Marathi News 24taas.com

थेन चक्रीवादळाने घेतले अठरा बळी

झी २४ तास वेब टीम, चेन्नई
 
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली 'थेन' चक्रीवादळाने चांगलाच दणका दिला आहे. या चक्रीवादळामध्ये जवळजवळ  १८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
 
बंगालच्या उपसागरात आलेले 'थेन' चक्रीवादळ तामिळनाडूत घुसल्याने सहा जण ठार झाले आहेत. तामिळनाडूतील कडड्लोर आणि पॉंडेचरीमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पॉंडेचरीचा बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. कड्डलोरमध्ये भिंत तसेच वीज कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण भारतातील किनारपट्टीवरील नागरिकांना इशारा देण्यात आला होता.
 
थेन नावाच्या च्रकीवादळाने आज दक्षिण भारताला तडाखा दिलेलला आहे. आंध्रप्रदेश, पॉन्डेचेरी आणि चेन्नईच्या किनारपट्टीच्या क्षेत्राला या वादळामुळं धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या हे वादळ चेन्नईपासून अडीचशे किलोमीटर दक्षिण पूर्वेकडे तर पॉन्डेचेरीपासून दोनशे सत्तर किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात घोंगावत आहे.
 
या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेश, पॉन्डेचेरी आणि चेन्नई किनारपट्टीच्या क्षेत्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळामुळं चेन्नईसह देशभरातल्या समुद्र किनाऱ्यांवर मोठमोठाल्या लाटा उसळत आहे. या लाटांमुळं मच्छिमारीसाठी गेलेले अनेक मच्छिमार बेपत्ता आहेत. त्यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.

First Published: Saturday, December 31, 2011, 13:43


comments powered by Disqus