हजाराच्या नोटेसाठी ३.१७ रुपयांचा खर्च - Marathi News 24taas.com

हजाराच्या नोटेसाठी ३.१७ रुपयांचा खर्च

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
चलन छपाईसाठी किती खर्च येतो असा जर तुम्हाला प्रश्न पडत असले...तर हे नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ  इंडियाने मागच्या वर्षी वेगवेगळ्या मुल्यांच्या १६.५ बिलियन नोटा छापण्यासाठी तब्बल २३७६ कोटी रुपये खर्च  केले. आणि हा खर्च वाढत जाणार आहे.
 
यात एक हजार रुपयांच्या नोटा छापण्यासाठी सर्वात कमी म्हणजे ३.१७ रुपये प्रति नोट खर्च आला. तर पाच रुपयाची नोट छापण्यासाठी ४८ पैसे खर्च झाले. याचाच अर्थ जास्त मुल्याच्या तुलनेत कमी मुल्यांची नोट छापण्यासाठी अधिक खर्च आला. गेल्या काही वर्षात नोटांची छपाई संख्येत सातत्याने वाढ झाली आहे. सन २००९-१० आणि २०१०-११ मध्ये चलनवाढ दोन अंकात होती आणि अन्नधान्य, डाळी, फळं आणि भाजीपाला महागला. ही सर्व खरेदी रोखीने होतं असल्याचं आणि  त्याला अधिक चलन लागतं. ही माहिती रिझर्व्ह बँकेच्या २०१०-११ सालच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे.
 
 
 
 

First Published: Sunday, January 1, 2012, 18:31


comments powered by Disqus