कलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद - Marathi News 24taas.com

कलमाडी-राजा यांनी घेतला खीर, हलव्याचा आस्वाद

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
 कॉमनवेल्थ घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी आणि 2 G स्पेक्ट्रम प्रकरणी अटकेत असलेले ए.राजा यांनी  तिहार जेलमध्ये नवर्षाचे स्वागत खास भोजनाचा आस्वाद घेत केलं. कलमाडी आणि राजा यांच्यासाठी पनीर,  खीर, हलवा असा खासा बेत होता. या दोन्ही व्हीआयपी कैद्यांनी आपल्या कुटुंबियांशी फोनवर संवाद साधला,  तसंच इतर कैद्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून मिठाईचाही स्वीकार केला.  चांगली वर्तणुक असलेल्या कैद्यांनाच फोनच्या वापरास परवानगी देण्यात येते.
 
नवीन वर्षाच्या आगमना निमित्त तिहारमधल्या कैद्यांसाठी पनीर करी, खीर, हलवा, पुरी, पराठा आणि पुलाव असा भोजनाचा बेत होता. राजा 2 G स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी फेब्रुवारी २०११ पासून जेलमध्ये आहेत. तर कलमाडी यांना कॉमनवेल्थ घोटाळ्यातील सहभागा प्रकरणी एप्रिलमधे अटक करण्यात आली होती. तिहारमधे जवळपास १२,००० कैदी अटकेत आहेत.
 
 
 
 

First Published: Sunday, January 1, 2012, 19:11


comments powered by Disqus