Last Updated: Sunday, January 1, 2012, 22:19
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
पाकिस्तानातील हिंदू आणि हाजरा समुदायाच्या लोकांना कठिण समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं प्रतिपादन पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख जोहरा यूसुफ यांनी केलं आहे.
जोहरा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांच्या ससेहोलपटीचा उल्लेख करण्यात आला आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायाला वाढत्या समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्यांकांना हत्या, खंडणी आणि हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं असल्याचं आयोगाच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. बलुचीस्तानातील हाजरा आणि हिंदूंना सुरक्षित ठिकाणाच्या शोधार्थ परदेशात आसरा शोधण्याची पाळी आली असल्याचंही अहवालात नमुद करण्यात आलं आहे.
First Published: Sunday, January 1, 2012, 22:19