देवा.... काय वर्णावा तुझा 'खजिना'.. - Marathi News 24taas.com

देवा.... काय वर्णावा तुझा 'खजिना'..

झी २४ तास वेब टीम, आंध्रप्रदेश
 
नव्या वर्षाच्या सुरुवातीला आम आदमीची महागाईची चिंता वाढणार असली तरी वर्षाच्य़ा सुरुवातीलाच देव मात्र श्रीमंत झाले आहेत. नव्या वर्षाच्या निमित्तानं शिर्डीमध्ये तब्बल चार लाख भाविकांनी दर्शन घेतलं.
 
विशेष म्हणजे यामध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी भाविकांचाही सहभाग होता. भाविकांना दर्शन घेता यावं, यासाठी रात्रभर मंदिर उघडं ठेवण्यात आलं होतं. तर दुसरीकडे तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठीही नव वर्षाला तुडुंब गर्दी होती.
 
नववर्षाच्या सुरुवातीलाच भाविकांनी तब्बल चार कोटींचं दान दिलं. गेल्या वर्षापेक्षा ४३ लाखांनी ही रक्कम जास्त आहे. गेल्या वर्षभरात तिरुपती देवस्थानामध्ये तब्बल १७०० कोटींचं दान जमा झालंय. नव वर्षाला भाविकांनी दिलेलं दान पाहता, यंदा हा आकडा प्रचंड मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
 

First Published: Monday, January 2, 2012, 10:53


comments powered by Disqus