भारताला ५ लाख नोकऱ्यांचं गिफ्ट - Marathi News 24taas.com

भारताला ५ लाख नोकऱ्यांचं गिफ्ट

झी २४ तास वेब टीम
 
नव्या वर्षात एक खूशखबर. तरूणांना नवनव्या क्षेत्रात गरूड भरारी मारता येणार आहे. येत्या वर्षात भारतात तब्बल पाच लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी सगळ्यात जास्त नोकऱ्या या महिती तंत्रज्ञान अर्थात IT मध्ये उपलब्ध असणार आहेत. IT क्षेत्रात यंदा जवळपास तीन लाख नोकऱ्यांची दारं उघडणार आहेत.
 
परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असल्यानं हे शक्य होतं आहे. आयटी खालोखाल रिटेल, आरोग्य, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पगारवाढही चांगली होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
 
जगभरात आर्थिक मंदीचं सावट असताना भारतात मात्र अनेक परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्यामुळे नोकरीच्या भरघोस संधी तरूणांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जगभरातील आर्थिक मंदीच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर नवे वर्ष भारतासाठी मात्र नक्कीच चागलं  असेल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. भारतामधील बेरोजगारांना हे 'न्यू इअर' गिफ्ट मिळाले असले तरी युरोपमध्ये मात्र याबाबत काहीसे चिंतेचे वातावरण असेल, अशी भीती आहे.
 
 

First Published: Monday, January 2, 2012, 09:48


comments powered by Disqus