Last Updated: Monday, January 2, 2012, 12:54
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
अण्णांचे आंदोलन असो किंवा, टूजी घोटाळा यासारख्या महत्वाच्या घटनानां मीडियाने उत्कृष्ट रित्या न्याय दिल्याने मीडियामुळे अनेकांवर वचक राहतो. त्यामुळेच मीडियावर बाहेरचं नियत्रणं असू नये असं पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
मीडियावर कोणतंही बाहेरचं नियंत्रण असू नये असं स्पष्ट मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं आहे. मात्र असं सांगत असताना मीडियानं काही बंधनं स्वतःहून घालून घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली आहे.
त्यामुळं पेड न्यूजसारख्या गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, FDI च्या मुद्यावर पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे.
First Published: Monday, January 2, 2012, 12:54