Last Updated: Tuesday, January 3, 2012, 14:00
24taas.com, लखनऊ उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे पोलिसांनी आज अज्ञाताकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीत घातपात करण्याच्या उद्देशाने ही शस्त्रास्त्र आणली गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
बनारस येथे जात असताना संतोष कुमार यादव याला अटक करण्यात आली आहे. संशयावरून पोलिसांनी त्याची तपासणी केली असता ही शस्त्रास्त्रे सापडली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवेळी या शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यात येणार होता, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संतोष यादवकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रांस्त्रांचा साठा जप्त केला.
संतोष यादवकडून एक स्टेनगन, १० बंदुका आणि अनेक काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संतोष हा झारखंडचा राहणारा आहे. त्यांने २० हजार रुपयांसाठी काम केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
First Published: Tuesday, January 3, 2012, 14:00