मायावतीचं काँग्रेसवर शरसंधान - Marathi News 24taas.com

मायावतीचं काँग्रेसवर शरसंधान

झी 24 तास वेब टीम, उत्तर प्रदेश
 
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका समीप येऊ लागल्याने राज्यातलं वातावरण आता तापू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला आहे. काँग्रेसची नजर दलित मतांवर आहे आणि त्यासाठी ते सुशीलकुमार शिंदेंना पंतप्रधान बनवतील असं विधान मायावतींनी केलं आहे. मायावतींची भिस्त दलित मतपेढीवर असल्याने त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.
 

राहुल गांधी उत्तर प्रदेशातील दलित मतदारांशी संवाद साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात त्या पार्श्वभूमीवर मायावतींनी हा हल्ला चढवला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस मीरा कुमार यांनासुद्धा पंतप्रधान करू शकते असे वाटते कारण की, काँग्रेस हा सत्तेसाठी कोणतीही पातळी गाठू शकते.
 
दिवसेंदिवस काँग्रेसवर चोहोबाजुनी टिकास्त्र सोडले जात आहे, त्यातच आता मायावती यांनी सुद्धा काँग्रेसवर तोंडसुख घेतलं आहे.  यावर काँग्रेस काय भुमिका घेणार? बिहार, उत्तरप्रदेश मध्ये काँग्रेसची झालेली पुरेवाट, यावरूनच सारे काही स्पष्ट होतं.

First Published: Friday, October 14, 2011, 14:07


comments powered by Disqus