बँक 'पोर्टेबलिटी', ग्राहकांना खबर 'स्वीटी स्वीटी' - Marathi News 24taas.com

बँक 'पोर्टेबलिटी', ग्राहकांना खबर 'स्वीटी स्वीटी'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मोबाईल क्रमांक आणि आरोग्य विमा पॉलिसीनंतर `नंबर पोर्टेबिलीटी` आता बॅंक क्षेत्रातही येऊ पाहत आहे. या सुविधेमुळे आता बचत खाते क्रमांक कायम ठेवुन बॅंक बदलण्याची सुविधा लवकरत खातेधारकांना मिळणार आहे.`केवायसी` शिवायही खातेधारकांना यामुळे बॅकं बदलता येणे शक्य होणार आहे.
 
रिझर्व्ह बॅंकेने बचत खात्यावरील व्याजदर नियंत्रणमुक्त केल्यानंतर बॅंकांमध्ये बचत खात्यावर अधिकाधिक व्याज देण्याची स्पर्धा लागली होती; मात्र बचत खाते क्रमांक बदलावा लागत असल्याने खातेदार इच्छित बॅंकांकडे जाऊ शकत नाहीत. लवकरच अस्तित्वात येणाऱ्या नंबर पोर्टेबिलिटीमुळे हे सहज शक्य होणार आहे.
 
बॅंकेच्या बचत खातेदारांचा क्रमांक कायम ठेवुन त्यांना बॅंक, शाखा बदलण्यासाठी सोय होण्यासाठी आवश्यक अशा तुरतुदींवर वित्तीय खाते काम करीत आहे. यासाठी ओळख क्रमांक, नो युअर कस्टमर म्हणजेच `केवायसी` तसेच कोअर बॅंकींग सोल्युशन यावर काम केलं जातं आहे. या योजनेबाबत वित्तीय सेवा विभागाचे सचिव डी. के. मित्तल यांनी माहिती दिली.

First Published: Wednesday, January 4, 2012, 19:07


comments powered by Disqus