‘एक नंबरी’ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’ - Marathi News 24taas.com

‘एक नंबरी’ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’


www.24taas.com , नवी दिल्ली
 
सोने खरेदी-विक्री करताना आपली फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्रा सरकारने ‘एक नंबरी‘ सोन्यासाठी ‘हॉलमार्क’ची सक्ती केली आहे. आज सोन्याला जागतिक बाजारपेठेत अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे सोन्यातील भेसळ रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
 
सोन्याच्या दागिन्यांना यापुढे हॉलमार्क बंधनकारक असणार आहे. हॉलमार्क’ची सक्ती करण्याता निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे सोन्यातील भेसळ आणि कमी वजनाची फसवणूक आता टळणार आहे. केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’कडून ‘हॉलमार्क’ वाटपाचे काम चालते.
 
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड’कायदा १९८६ मध्ये दुरूस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.  त्यानंतर या दुरूस्तीला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार सोन्यासाठी ‘हॉलमार्क’ची सक्ती केली गेली आहे.  विक्री करताना सोन्यावर प्रमाणित ‘हॉलमार्क’ असणे बंधनकारक असेल.

First Published: Thursday, January 5, 2012, 10:44


comments powered by Disqus