देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- रतन टाटा - Marathi News 24taas.com

देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम- रतन टाटा

www.24taas.com वेब टीम
 
सरकारच्या निर्णय घेण्याच्या कूर्मगती बाबतीत देशातील आघाडीच्या उद्योगपतींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली असली तरी रतन टाटांनी मात्र वेगळं मत प्रदर्शित केलं आहे. भारताची अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने जगभरात आर्थिक आरिष्ट्याने थैमान घातलं असलं तरी निराश होण्याचं काहीच कारण नाही असं मत रतन टाटांनी व्यक्त केलं आहे.
 
 
आपण नैरायश्यवादी होता कामा नये, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम आहे आणि आर्थिक वाढीचा दर अधिक होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी उद्योगक्षेत्रातील नेतृत्वाला सरकारी धोरणांसंबंधित नकारात्मक प्रतिक्रिया संदर्भात फटकारलं होतं. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे अनिश्चितता निर्माण होते असं पंतप्रधान म्हणाले होते.
 
निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारींसंदर्भात पंतप्रधान म्हणाले की सरकार अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी पोषक परिस्थितीच्या निर्मितीसाठी बांधील आहे.
 
सरकारने काय करायला हवं असं रतन टाटांना विचारला असता सरकारने आवश्यक त्या क्षेत्रात खर्चात वाढावायला हवा तसंच  रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे.
 

First Published: Thursday, January 5, 2012, 18:41


comments powered by Disqus