ब्रह्मश्री नारायण गुरुंचे चरित्र 23 भाषांमध्ये - Marathi News 24taas.com

ब्रह्मश्री नारायण गुरुंचे चरित्र 23 भाषांमध्ये

झी 24 तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
स्वर्गीय टी.भास्करन यांनी लिहिलेल्या ‘ब्रह्मश्री श्री नारायण गुरु’ या पुस्तकाचे भाषांतर इंग्रजीसह 23 भाषांमध्ये करण्याचा प्रकल्प नॅशनल अकादमी ऑफ लेटर्सने हाती घेतला आहे. साहित्य अकादमीचा आजवरचा हा सर्वात मोठा भाषांतराचा प्रकल्प आहे.
 
अकादमीने श्री नारायण गुरु यांच्या व्यक्तीत्वाचा वेध घेणारे हे 18 प्रकरणांचे छोटेखानी चरित्र 2009 साली प्रकाशीत केलं होते. या संदर्भात खासदार पी.टी.थॉमस यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता आणि त्याआधारेच अनेक भारतीय भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित करण्याचा निर्णय साहित्य अकादमीने घेतला. ए.जे.थॉमस या पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करणार आहेत.

First Published: Tuesday, October 18, 2011, 14:52


comments powered by Disqus