तुळस आजारांवरही रामबाण - Marathi News 24taas.com

तुळस आजारांवरही रामबाण

www.24taas.com,   भुवनेश्वर
 
भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( डीआरडीओ) तुळशीपासून बनविल्या  औषधाची पहिली चाचणी यशस्वी घेतली. तुळशीतील ऑक्सिडीकरण रोधक (अँटी ऑक्सिडंट) गुणधर्माचा किरणोत्साराने बाधित झालेल्यांच्या खराब पेशी व्यवस्थित करण्यास उपयोग होऊ शकतो, असे आढळल्यानंतर 'डीआरडीओ'च्या संशोधकांनी हे औषध बनवण्यास सुरुवात केली.
 
 
तुळशीपासून बनविलेल्या औषधाची प्राथमिक चाचणी प्राण्यांवर करण्यात आली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यात तुळशीपासून बनविलेल्या औषधाची आणखी चाचण्या करण्यात येतील व त्यांच्या यशस्वीतेनंतर या औषधाचे उत्पादन सुरू केले जाईल, अशी माहिती डीआरडीओच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्य नियंत्रक डब्ल्यू. सेल्वामूतीर् यांनी दिली.
 
किरणोत्सार बाधितांवरील उपचारासाठी पहिल्यांदाच तुळशीचा वापर करण्यात येत आहे. किरणोत्साराच्या बाधेवरील सध्याची औषधे अत्यंत विषारी आहेत. मात्र तुळशीसारख्या आयुवेर्दिक औषधामुळे या उपचारांतही सुरक्षितता येईल, असे ते म्हणाले. सर्दीखोकल्यापासून अनेक नियमित आजारांवरचा रामबाण इलाज असलेली आजीच्या बटव्यातली तुळस आता आधुनिक युगाने निर्माण केलेल्या आजारांवरही रामबाण ठरत आहे. किरणोत्साराने बाधित झालेल्यांसाठी तुळस गुणकारी असल्याचे सांगत डीआरडीओ तुळशीपासून खास औषध बनवलं आहे.
 
 
दरम्यान,  दुर्गम भागात उपासमारी सोसणाऱ्या सैनिकांसाठी 'हेल्थ ड्रिंक' म्हणून १५ वनस्पतींपासून बनवलेला अर्क लवकरच सैन्यदलाला पुरवण्यात येखार आहे. तर डोंगराळ भागात तैनात जवानांना किटकमाश्या चावू नये म्हणून 'अलोकल' ही क्रीम डीआरडीओने बनवली आहे. या क्रीमचे ५ लाख डबे नुकतेच लष्कराला पाठविलेत.
 

First Published: Tuesday, January 10, 2012, 15:40


comments powered by Disqus