येडियुरप्पा इस्पितळातून जेलमध्ये - Marathi News 24taas.com

येडियुरप्पा इस्पितळातून जेलमध्ये

झी २४ तास वेब टीम, बंगळुरू
                   कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. बंगळुरूच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना १६ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज बरं वाटू लागल्यानं त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे. दरम्यान अडवाणींच्या वक्तव्यावर येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना भाजपातल्या अशा प्रकारामुळं पक्षाची अडचण होत असल्याचं वक्तव्य अडवाणी यांनी परवा नागपूरमध्ये केलं होतं. येडियुरप्पा यांच्या समर्थकांनी मात्र येडियुरप्पा यांना जाणूनबुजून अडकवलं जात असल्याचा आरोप केला आहे. येडियुरप्पा यांच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे.

First Published: Wednesday, October 19, 2011, 06:53


comments powered by Disqus