Last Updated: Wednesday, January 11, 2012, 09:37
www.24taas.com, रांची 
आज सकाळी ब्रम्हपुत्र मेल आणि एका मालगाडी मध्ये टक्कर होऊन अपघात झाला, ट्रेनचा एक डब्बा घसरल्याने दोन जणांचा मृत्यु झाल्याचे समजते. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
गुवाहटीवरून दिल्लीला जाणारी ब्रम्हपुत्रा मेलला हा अपघात झाला आहे. आज सकाळी जवळ जवळ पहाटे सहा वाजता हा अपघात झाला. साहिबगंजच्या २० किमी. दूर कर्णपुरा जवळ ह्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. साहिबगंजहून दोन ट्रेन मदतकार्यासाठी रवाना करण्यात आल्या आहेत. जखमींना जवळच्या कर्णपुर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार ब्रम्हपुत्रा एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने समोरील मालगाडीवर जाऊन धडकली आणि त्यांचा एक डब्बा रूळावरून घसरला. जवळजवळ डझनभर प्रवासी हे या डब्यात अडकल्याचे समजते. मेडिकल व्हॅन आणि डॉक्टरांचं पथक घटनास्थळी पोहचले आहे. डीआरएम हर्ष कुमार यांच्यामते या अपघातात दोन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर अनेकजण जखमी झाली आहे.
First Published: Wednesday, January 11, 2012, 09:37