Last Updated: Wednesday, January 11, 2012, 12:06
www.24taas.com, अंदमान 
अंदमानच्या जंगलात राहणाऱ्या 'जरावा' या आदिवासी जमातीतील लोकांच्या गरीबीची थट्टा उडवली जात आहे. या आदिवासींना पाहण्यास रोज हजारो पर्यटक येतात, या आदिवासींना नाचण्यास सांगितलं जातं. त्यांचा नग्नतेविषयी त्यांची मस्करी केली जाते. त्यांच्यावर खाण्यापिण्याच्या वस्तू फेकल्या जातात, पण ह्या गोष्टी अत्यंत घृणास्पद आहेत. कारण की ते काही जनावरं नाहीत तर आपल्यासारखेच मानव आहेत.
ह्या आदिवसींना येथे येणाऱ्या पर्यटकांची भाषा अजिबात समजत नाही, त्यामुळे नाईलाजाने त्यांना या लोकांच्या समोर अर्धनग्न अवस्थेतत नाचावं लागत आहे. तर एकिकडे टूर गाईड २५,००० रू. प्रति वाहन अशा दराने या लोकांना दाखवण्यासाठी पर्यटकांना घेऊन जातात, त्यांच्यामते हे लोक पर्यटकांसाठी प्राणीसंग्रहालयातील प्राणीच आहेत. या बेकायदेशीर कमाईमध्ये तेथील स्थानिक पोलीस सुद्धा भागीदार आहेत. सरकारी आकड्यानुसार जरावा जातीच्या या लोकांची संख्या जवळजवळ ४०३ आहे.
सरकारने या लोकांपासून दूर राहण्यासाठी सक्त नियम बनवले आहेत. त्यांच्या क्षेत्रामध्ये जाण्यास मज्जाव आहे तसचं खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यास मनाई असल्याचे सुचना फलक लावण्यात आले आहेत. पण टूर गाईड आणि पोलीस यांच्या मदतीने या लोकांना जानवरांसारखं दाखवण्याचा खेळ सरार्सपणे सुरू आहे. आणि हे सारं कायदे धाब्यावर बसून केलं जात आहे. जरावा जातीची लोक हे आदिवासी जातीतील एक दुर्मिळ जमात आहे , जवळजवळ १९९० मध्ये या लोकांचा बाहेरील जगाशी संपर्क आला. हे जंगलात राहणारे आदिवासी प्रजातीतील लोक आहेत. हे लोक अंदमान आणि हिंदी महासागराच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. हे लोक अजुनही सुधारीत जीवन जगत नाही, पुरूष आणि महिला हे अर्धनग्न अवस्थेत असतात. हे लोक फक्त कमरेच्या खाली झाडांच्या पानांनी आपलं शरीर झाकतात. त्यामुळे अश्या अर्धनग्न लोकांना शहरातील लोकं तेथे जाऊन या अवस्थेत नाचायला लावतात.
First Published: Wednesday, January 11, 2012, 12:06