Last Updated: Thursday, October 20, 2011, 05:24
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन उभारुन देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी रणशिंग फुंकणाऱ्या ‘टीम अण्णां’मधील सदस्य किरण बेदी यांचा ‘हवाई’ घोटाळा पुढं आला आहे.
किरण बेदी यांनी विमान प्रवास करताना ‘शौर्य’ दाखवून प्रवासाच्या भाड्यात सूट मिळविण्यासाठी ‘पदकां’चा आधार घेतला. इकॉनॉमी श्रेणीतून प्रवास करुन बिझनेस श्रेणीचे भाडे वसूल केल्याची १२ प्रकरणे पुढे आली आहेत. त्यांचे जुने प्रकरण २००६ चे तर नवे प्रकरण २९ सप्टेंबर २०११ मधील आहे. ज्या संस्थांच्या कार्यक्रमांसाठी त्या जात असत त्यांच्यांकडून बिझनेस श्रेणीचे भाडे वसूल केल्याचे पुढं आलं आहे.
दरम्यान, मी विमान प्रवास करताना बिझनेस श्रेणीच्या तिकिटाचे पैसे घेत असे. परंतु इकॉनॉमी श्रेणीतून प्रवास करुन पैशांची बचत केली. हे बचतीचे पैसे समाजहिताच्या कामांसाठी संस्थांना दिले आहेत. मी पैसे वाचवून संस्थेला मदत केली. परंतु पैसे वाचवल्यानंतर स्पष्टीकरण देण्याची माझ्यावर वेळ येते. मात्र, पैसे उधळणा-यांना कोणी विचारत नाही, असे स्पष्टीकरण किरण बेदी यांनी दिलं आहे.
First Published: Thursday, October 20, 2011, 05:24